Ad will apear here
Next
रणवीरसिंग ‘कॅरेरा’चा ब्रँड अॅम्बेसिडर
 मुंबई :  ‘कॅरेरा’ या जागतिक लाईफस्टाईल ब्रँडने आपला ब्रँडअॅम्बेसिडर रणवीरसिंगसह  नव्या  जाहिरात मोहिमेचे सादरीकरण केले आहे. ‘#DRIVEYOURSTORY’ या मोहिमेद्वारे आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ स्पष्ट करण्यात आला आहे. या जाहिरात मोहिमेत रणवीरसिंग याने नवीन सिग्नेचर कलेक्शन वापरले असून यात इटालियन डिझाईन,  शहरी दृष्टिकोनासाठी कलात्मक रचना वापरण्यात आली आहे.  

‘आजवरच्या साठ वर्षांच्या इतिहासात बोल्ड स्टाईलचे कौतुक अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केले आहे. त्यांच्या अत्याधुनिक  मोहिमेचा भाग झाल्याबद्दल मला आनंद होत असून त्यासाठी खूप कष्ट घेण्याची माझी तयारी आहे.  कष्ट असोत वा यश... त्यातून व्यक्तीचे खास व्यक्तिमत्वच समोर येते. तुम्ही या मोहिमेत माझी स्वतःची गोष्ट पाहू शकाल. फिटनेस आणि स्टाईलचा सुंदर मिलाफ साधलेल्या या नवीन स्टाईल्समुळे गर्दीच्या ठिकाणी तुमचे अस्तित्व नक्कीच वेगळे दिसू शकेल.’ असा विश्वास रणवीरसिंगने व्यक्त केला.

याबाबत बोलताना आयएमईए आणि एपीएसी (साफिलो समुह) चे व्यवस्थापकीय संचालक क्यारियाकोस कोफिनास म्हणाले, ‘रणवीर सिंगशी गेले वर्षभर आमची सशक्त भागीदारी सुरू असून, त्याने आमच्या ब्रँडमध्ये त्याचे खास रंग भरले आहेत. रणवीर सिंगसह या वर्षाची सुरुवात नव्या सिग्नेचर कलेक्शनने करताना आम्हाला आनंद होतो आहे. आजच्या तरुणाईच्या मनात घर करणारे कल्पक   कलेक्शन तयार करणे हा आमचा ध्यास आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZVNBM
Similar Posts
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये
अॅक्सिस बँक शारजामध्ये कार्यरत शारजा : ‘अॅक्सिस बँक’ या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने संयुक्त अरब अमिरातीतील शारजा येथे प्रतिनिधी कार्यालय सुरू केले आहे. भारताचे दुबईतील राजदूत विपुल यांच्या हस्ते नुकतेच या प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन झाले. शारजातील प्रतिनिधी कार्यालय अॅक्सिस बँकेचे यूएईतील तिसरे कार्यालय आहे
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language